आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:चाळीसगावात 12 हरकती; व्याप्तीसह सीमेबाबत आक्षेप, 23 रोजी सुनावणी ; अखेरच्या दिवशी तब्बल १० हरकती

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आरक्षणविरहित जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १२ हरकती घेण्यात आल्या आहेत. अखेरच्या दिवशी तब्बल १० हरकती घेतल्याने सुनावणीसाठी आता प्रशासनाची दमछाक होणार आहे. येत्या २३ मे रोजी या हरकतींवर सुनावणी होणार असून त्यात दिलासा न मिळाल्यास काही हरकत धारकांनी थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. सर्वाधिक हरकती व सूचना दत्तवाडी भागातील आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेली प्रभाग रचना २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. मध्यंतरी हा कार्यक्रम स्थगित झाला. न्यायालयाच्या आदेशानंतर स्थगित झालेली प्रक्रिया पुन्हा पुढे सुरू झाली. त्यानुसार या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून १० ते १४ मे दरम्यान हरकती, सूचना मागवल्या होत्या.

२३ मे रोजी सुनावणी

निवडणूक आयोगाद्वारे पालिका क्षेत्रातील १८ प्रभागांची रचना घोषित करण्यात येऊन त्यावर हरकती, सूचना मागवल्या होत्या. यात काहींनी प्रभागाची व्याप्ती व सीमांकनावर तर काहींनी भागाच्या अदलाबदलीवर आक्षेप घेतला आहे. या सर्व हरकती, सूचनांची प्रभागनिहाय यादी तयार केल्यानंतर प्रशासन त्यांचे निरीक्षण करतील. मग अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांपुढे २३ मे रोजी या हरकतींवर सुनावणी होईल.

बातम्या आणखी आहेत...