आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिनानिमित्त सुमारे १३० विद्यार्थ्यांनी अमळनेर पोलिस ठाण्याला भेट देत, दैनंदिन कामकाज व शस्त्रांची माहिती जाणून घेतली. शहरातील ग्लोबल स्कूलचे इत्तत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शिक्षक यांनी, महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिनानिमित्त (रेझिंग डे) पोलिस स्टेशनला भेट दिली. पोलिस निरीक्षक विजय शिंदे, गोपनीय शाखेचे शरद पाटील व कर्मचाऱ्यांकडून पोलिस दल स्थापना दिनाचे (रझिंग डे) महत्व समजावून सांगण्यात आले. तसेच पोलिस स्टेशनच्या दैनंदिनी कामकाजाची विभागनुसार प्राथमिक स्वरुपाची माहिती, तसेच विविध शस्त्रांची माहिती देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी शाळेचे १३० विद्यार्थी व विद्यार्थीनी हजर होते.
पोलिस ठाण्याच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पोलिसांबदल असलेली भिती मनातून काढून त्यांना पोलीस खात्याचे कामकाज समजावून सांगितले. तसेच सध्या सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण अगर माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिस स्टेशनला कळवावे, असे मार्गदर्शन करुन आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना पोलिस अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.