आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जामनेरातील 130 गावांचे होणार ‘ड्रोन मॅपिंग’

जामनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर तालुक्यातील १३० गावांचे ड्रोन मॅपिंग केले जाणार आहे. बुधवारी ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते वाकी बुद्रूक येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

बुधवारी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते जामनेर तालुक्यात ड्रोन मॅपिंगला सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एस.पी.मगर, उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार अरूण शेवाळे, भूमीअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक शितल लेकुरवाळे यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुर्वी ग्रामस्थांनी आपल्या मालमत्तांचे उतारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घ्यावे लागत होते.

मात्र, प्रशासकीय कामकाजात अशा उताऱ्यांचा वापर आता अडचणीचा ठरत आहे. ड्रोन मॅपिंग झाल्यानंतर आता मालमत्तांचे कायमस्वरुपी नकाशे तयार केले जातील. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना संगणकीय उतारे मिळतील. एका क्लिकवर मालमत्तांच्या उताऱ्यांची माहिती घेता येईल. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाला गती मिळून, नागरिकांची गैरसोयदेखील दूर होणार आहे.

ड्रोन मॅपिंग का ?... जामनेर तालुक्यातील १४८ पैकी १३० गावांना सिटीसर्वे लागू नाही. त्यामुळे येथील मालमत्तांचे केवळ ग्रामपंचायतीचे उतारे मिळतात. मात्र त्यामुळे नागरीकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. नागरीकांची समस्या सोडवण्यासोबत, मालमत्तांचे कायमस्वरूपी नकाशे तयार व्हावेत, यासाठी शासनाने ड्रोन मॅपिंगचा निर्णय घेतला आहे.

अधिकाऱ्यांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन हे खडकी येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजनानंतर ड्रोन सर्वेक्षणाच्या शुभारंभासाठी वाकी बुद्रूक येथे जाणार होते. मात्र त्यांनी अचानक निर्णय बदलून खडकीऐवजी आधी वाकीला जाण्याचा निर्णय घेतला. मंत्री वाकी गावात पोहोचले तेव्हा जिल्हाधिकारी मित्तल हे रेशीम शेती बघण्यासाठी सोनाळ्याला गेले होते. तर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया हे जामनेरलाच होते. मंत्री पोहोचल्याने अधिकाऱ्यांनी धावपळ करून वाकी गाठले.

बातम्या आणखी आहेत...