आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गिरणातून सुटले 1500 क्युसेस आवर्तन; चाळीसगाव, भडगाव, पाचोऱ्यातील गावांना दिलासा

चाळीसगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाची तीव्रता वाढताच गिरणेच्या पाण्यावर आवलंबून असलेल्या गावांमध्ये टंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहेत. या टंचाईग्रस्त भागाला दिलासा देण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून रविवारी दुपारी १ हजार ५०० क्युसेस पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले.

त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी. तसेच आवर्तन पिण्यासाठीच असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले कृषीपंप बंद ठेवावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. या आवर्तनामुळे टंचाईग्रस्त गावांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. टंचाई दूर होण्यासाठी गिरणा धरणातून आर्वतन सोडण्याची मागणी होती. त्यामुळे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग यांच्या आदेशानुसार रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास १५०० क्युसेसचे आवर्तन सोडण्यात आले, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी दिली.

यंदाचे हे चौथे आवर्तन
गिरणा धरणातून यापूर्वी सिंचनासाठी तीन आवर्तने दिली आहेत तर आता चौथे आवर्तन पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने एकूण पाच आवर्तने देण्याचे नियोजन केले आहे. त्यातील चार आर्वतने सोडली गेली असून यापुर्वी शेवटचे आवर्तन गिरणा धरणातून मार्चमध्ये सोडले होते. मंगळवारचे चौथे आर्वतन सुटल्यांनतर धरणात ४० टक्के जलसाठा शिल्ल्क राहील.

बातम्या आणखी आहेत...