आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काडतुसे:तीन गावठी कट्ट्यांसह 17 काडतुसे जप्त; पुण्याच्या चौघांना चोपडानजीक पकडले

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रस्त्यावरील उत्तमनगर गावाजवळ ४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशकडून चोपड्याकडे येणाऱ्या होंडा कंपनीची चारचाकीतून अवैधरित्या तीन गावठी कट्टे व १७ जीवंत काडतूसे घेऊन जातांना पुण्यातील चार जणांना रंगेहाथ पकडले आहे. पथकाला मिळालेल्या माहितीवरून आज नाशिकचे पोलिस महानिरीक्षक पथक व चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गावठी कट्ट्यावर मोठी कारवाई केली. मध्य प्रदेश सीमेकडून तालुक्यातील लासूर गावाकडे संशयित आरोपी येत असलेली गाडी पोलिसांनी सत्रासेन व उत्तमनगर या दोन्ही गावांच्या मध्ये घाटाखाली थांबवली. या गाडी (एमएच- १२, एमएफ- ०३१६) मधील चार तरुणांमध्ये पुणे येथील वडगाव बुद्रुक येथील रवींद्र वसंत खारगे (वय २४), जयेश लक्ष्मण भुरूक (वय २४), जिजाबा मल्हारी फाडके (वय ३९) व चांदपाशा अजीज शेख (वय ३२) यांचा समावेश हाेता. या तरुणांच्या ताब्यातून तीन गावठी कट्ट्यांसह १७ जिवंत काडतूसे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी तीन गावठी कट्टे, १७ काडतूसे व एक कार अशी एकूण ७ लाखांची कारवाई केली. यातील संशयित जयेश भुरुक याच्यावर पुण्यातच वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...