आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी उत्तीर्ण:एनएमएमएस परीक्षेत 17 विद्यार्थी उत्तीर्ण

चोपडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्लीतर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध (एनएमएमएस) परीक्षेत, येथील पंकज विद्यालयाचे १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत निवडले गेले. निवडलेला प्रत्येक विद्यार्थी ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.

१९जून रोजी झालेल्या या प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना, इयत्ता नववी ते बारावीपर्यंत प्रतिवर्ष प्रत्येकी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. या परीक्षेत आतापर्यंत विद्यालयाचे २२५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मनस्वी दीपक पाटील, खुशी चंद्रशेखर सोनवणे, वैभव योगेश पेंढार, अरविंद चंद्रशेखर सोनवणे, खुशी वसंत पाटील, जयेश सचिन पाटील, यशराज शरद शिरसाट, सानिका शशिकांत पाटील, अवनी अरविंद पाटील, दिव्यांनी गोकुळ पाटील, प्राची प्रमोद सूर्यवंशी, समीक्षा सुधीर चौधरी, जिग्नेश ज्ञानेश्वर सोनगिरे, कावेरी संजय पाटील, संजना जगदीश भोई, आदित्य संतोष सपकाळे, विनिता शांताराम कोळी यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना आर.के.माने, बी.एम.तायडे, व्ही.बी.पाटील, पी.सी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंतांचा सत्कार संस्था संचालक पंकज बोरोले यांनी केला. संस्थाध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, गोकुळ भोळे, भागवत भारंबे, अशोक कोल्हे, मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील, मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील, प्राचार्य डॉ.आर.आर.अत्तरदे यांनी कौतुक केले.स

बातम्या आणखी आहेत...