आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामनेर तालुक्यातील चिलगाव येथील १७६ नागरिकांनी मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. स्वर्गीय कांतीलाल चंपालाल ललवाणी यांचे मागील वर्षी कोरोना काळात निधन झाले होते.
त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा एकुलता एक मुलगा निशांत (वय २०) याला शर्तीचे प्रयत्न करुन जवळपास २५ पिशव्या रक्त संकलित करुन द्यावे लागले होते. शेंदुर्णी, पाचोरा, जळगाव, नाशिक अशा विविध ठिकाणी निशांतने वडिलांच्या उपचारासाठी लागणाऱ्या रक्त पिशव्या गोळा केल्या, यासाठी त्याला मोठे परिश्रम करावे लागले होते. या अनुभवातून वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणला त्यांनी मोफत रक्तगट तपासणी शिबिर घेतले. डॉ. विनोद परदेशी व डॉ. सोपान पाटील यांच्या सहकार्याने चिलगाव येथे हे शिबिर घेण्यात आले.
यात चिलगाव येथे १७६ नागरिकांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाला निशांत ललवाणी याने केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे चिलगावसह परिसरात कौतुक होत आहे. तर आगामी वर्षापासून अधिकाधिक रक्त संकलन करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.