आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी:अमळनेरात मतमोजणीला 18 टेबल, 54 कर्मचारी

शहर प्रतिनिधी | अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुदत संपलेल्या २० ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. आता सोमवारी सकाळी १० वाजेपासून इंद्रभवनात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी महसूल व पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल समोर येणार आहेत.

मतमोजणीसाठी इंद्रभवन मंगल कार्यालयात १८ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक, सहायक व कोतवाल असे तीन कर्मचारी नियुक्त आहेत. एकूण ५४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक टेबलवर चार फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी चार अधिकारी, ४५ कर्मचारी व ३० होमगार्ड असा बंदोबस्त आहे. परिसरात १०० मीटरपर्यंत रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

वाद्यांना परवानगी नाही मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी मिरवणूक व वाद्ये वाजण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.विजय शिंदे, पोलिस निरीक्षक, अमळनेर

बातम्या आणखी आहेत...