आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची प्रतीक्षा:अमळनेरात 18 हजार हेक्टर क्षेत्रावरील धूळपेरणी संकटात; 21 हजार हेक्टर बागायती कपाशी कोमेजली

अमळनेर/पाडळसरे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर तालुक्यातील पांझरा व तापी पट्यात दरवर्षी पावसाचे आगमनाची चाहूल लागताच अनेक शेतकरी धूळपेरणी करतात. मारवड व भरवस मंडळात जास्त प्रमाणात कापूस, मूग, उडीद, मका पेरणी केली जाते. मात्र मृगाचे १३ दिवस उलटूनही दमदार पावसाची नोंद कुठेही नाही. १८ हजार हेक्टरवर धूळपेरणी केलेले बियाणे पाऊस लांबल्याने धोक्यात आले आहे. तर २१ हजार हेक्टरवरील बागायती कपाशी कोमेजत आहे.

अमळनेर तालुक्यातील ६८ हजार पेरणीयोग्य क्षेत्रापैकी २१ हजार हेक्टरवर बागायती कापूस अाहे. तर १८ हजार हेक्टरवर कापूस, मका, उडीद, मूग आदी पिकांची धूळपेरणी केल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला अाहे. पेरणीसाठी योग्य ओल निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले.

धरणगावात अर्धातास पाऊस
शहरासह तालुक्यात २० रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अर्धातास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. कपाशीचे पिक पावसाअभावी कोमेजत होते. त्यामुळे शेतकरी बैलगाडीने पाणी आणून पिकाला चुआपाणी देत होते. मात्र, पावसामुळे आता पिक तरारणार आहे. तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

एरंडोलला कपाशीची लागवड निम्मेच
तालुक्यातील चार मंडळांमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पेरण्यांना विलंब होत आहे. तालुक्यात दरवर्षी २१ हजार ४१० हेक्टरवर कपाशीची लागवड होते. मात्र यंदा २० जूनपर्यंत केवळ ११ हजार ३७५ हेक्टर अर्थात ५३% बागायती कपाशीची पेरणी झाली आहे. तसेच थोड्या प्रमाणात मक्याची पेरणी झाली आहे. तालुक्यात शेतकरी दरवर्षी १४४७ हेक्टरवर ज्वारी, ८२० हेक्टर बाजरी, ६७७८ हेक्टर मका, २८५३ हेक्टर मूग, १५०२ हेक्टर उडीद, १९८३ हेक्टर सोयाबीन पेरतात. मात्र, पाऊसच नसल्याने यंदा पेरण्या खोळंबल्या असून, पावसाची प्रतीक्षा आहे.

दि. १९ पर्यंत अमळनेरात झालेला मंडळनिहाय पाऊस
अमळनेर ८५.८ मिमी
शिरूड २०.४
पातोंडा २४.९
मारवड २०.३
नगाव २०.४
अमळगाव २२.१
भरवस १६.९
वावडे ५९.९
एकूण ३३.९

बातम्या आणखी आहेत...