आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना:अवघा १२ रुपयांत वारसाला विमा योजनेंतर्गत दिली २ लाखांची मदत

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील गरीब आणि आर्थिक दुर्बल नागरिकांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. महिन्याला १ रुपया तर वर्षाला केवळ १२ रूपये हप्ता भरून २ लाख रूपयांचा या योजनेचा लाभ घेता येवू शकतो. या विमा योजने अंतर्गत तालुक्यातील पाताेंडा येथील अपघाती मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या वारसाला नुकताच २ लाख रूपयांचा लाभ मिळाला.

तालुक्यातील हिंगोणे येथील लक्ष्मण बोरसे नाशिक येथे खाजगी कंपनीत कामाला होते. दीड वर्षापूर्वी ते हिंगोणे येथे येत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांनी पातांेंडा पोस्ट कार्यालयांतर्गत हिंगोणे पोस्ट शाखेतून पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत वर्षाला अवघे १२ रुपये भरून दाेन लाखाचा विमा काढलेला होता. पतीने पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी हप्ता भरल्याने त्यांच्या पत्नी बोरसेंच्या लक्षात आले. त्यांनी पातोंडा पोस्ट कार्यालयास विमा धारकाच्या वारसदार म्हणून योजनेचा लाभ मिळण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांचे प्रकरण तयार करून दिल्लीस पाठवले. मात्र त्यांचे विम्याचे कागदपत्र व आधार कार्ड यावरील नाव वेगवेगळे असल्याने दिल्लीहून प्रकरण परत आले. त्याचवेळी पातोंडा पोस्ट कार्यालयाचा कार्यभार मनोज करंकाळ यांनी स्वीकारला. त्यांच्या तत्परतेच्या पाठपुराव्यामुळे २ लाखांची विमा रक्कम मंजूर झाली.

मुलांसाठी माेलाची मदत
दिल्ली कार्यालयातून आरटीजीएसमार्फत २ लाख रुपयांची रक्कम पातोंडा पोस्ट कार्यालयातील आशा बाेरसे यांच्या खात्यावर वर्ग झाली. नंतर त्यांना विमा मंजुरीचे पत्र मनोज करंकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी यावेळी बोरसेंच्या डाेळ्यात आनंदाश्रू हाेते. ही रक्कम मुलांच्या व्यवसायासाठी कामी येईल, असे सांगून पोस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...