आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार:चोपडा सूतगिरणीच्या 21 जागा, 53 उमेदवार

चोपडा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तापी सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र गुरुवारी स्पष्ट झाले. काँग्रेस व राष्ट्रवादीचे पॅनल विरोधात भाजपच्या पॅनलमध्ये लढत रंगणार आहे. २१ जागांसाठी ५३ जण रिंगणात आहेत.

कापूस उत्पादक मतदारसंघात १५ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात असून, महिला राखीव मतदार संघातून दोन जागांसाठी पाच उमेदवार आहेत. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात एका जागेसाठी दोन, भटक्या विमुक्त जाती मतदार संघात एका जागेसाठी तीन, बिगर कापूस उत्पादक मतदारसंघात एका जागेसाठी दोन, इमाव मतदार संघात एका जागेसाठी दोन असे एकूण ५३ उमेदवार आहेत. २४ रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप झाले. ४ डिसेंबरला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल. ५ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...