आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखीव:भडगाव नगरपरिषदेत 21 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ; 1 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असेल

भडगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रभाग निहाय आरक्षण सोडत कार्यक्रम १३ जून रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषदेच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी भडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी प्रभाग आरक्षण संदर्भातील सर्व माहिती उपस्थित नागरिक, प्रतिनिधींना समजावून सांगितली. भडगाव शहरातील एकूण १२ प्रभागात प्रत्येकी २ याप्रमाणे २४ जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती करीता १ जागा, अनुसूचित जमाती करिता २ तर उर्वरित २१ जागा सर्वसाधारण प्रवर्गा करिता उपलब्ध झाल्या आहेत. यात प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ११मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण (महिला), प्रभाग १२मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण (महिला) तर उर्वरित प्रभाग क्रमांक २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १० येथे प्रत्येकी १ जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव तर १ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असेल. टाेणगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची विद्यार्थिनी हर्षदा वाडेकर व मिताली पाटील यांनी आरक्षण सोडत चिठ्ठी काढल्या. सभेसाठी अधीक्षक परमेश्वर तावडे, लिपिक नितिन पाटील यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...