आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना लाभ:अंजनी प्रकल्पासाठी 232 कोटींच्या प्रस्तावास मिळाली प्रशासकीय मंजुरी

एरंडोल15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी, सुमारे २३२ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे, प्रकल्पाची सिंचन क्षमता पूर्ण होऊन, सुमारे २८३१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अंजनी मध्यम प्रकल्पाच्या वाढीव उंचीसह काम २००८ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, प्रकल्पाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी आमदार पाटील यांनी प्रयत्न केले. प्रकल्पाच्या कामासाठी २३१ कोटी ८२ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी केली होती.

बंदिस्त नलिकांद्वारे वितरण शेतकऱ्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचा लाभ मिळणार आहे. एरंडोल तालुक्यातील सुमारे २०६८ हेक्टर आणि धरणगाव तालुक्यातील ७६२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पुढील पंधरा दिवसात पद्मालय साठवण तलाव व उपसा सिंचनच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदारांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...