आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे आयोजित अमोलभाऊ शिंदे चषक २०२२/२३, ही पाचोरा, भडगाव तालुक्यातील आंतरशालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. शिंदे इंटरनॅशनल स्कूल भडगाव रोड पाचोरा येथे, ३१ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात झालेल्या स्पर्धेत १२ क्रीडा प्रकारात २३५५ शालेय क्रीडापटूंनी सहभाग नोंदवला. ३१ डिसेंबरला खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. २ जानेवारीला संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे व सचिव अॅड. जे.डी. काटकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. अमोल शिंदे यांनी तीन दिवसीय स्पर्धेचा आढावा घेतला.
डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल जाधव, जेसीस क्लबचे अध्यक्ष रोहित रिझाणी, माणिकराजे ट्रस्टचे विश्वस्त प्रा. रविंद्र चव्हाण, पाचोरा क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, भडगाव क्रीडा समन्वयक डॉ. सचिन भोसले, रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. गोरखनाथ महाजन, भाजपाचे तालुका सरचिटणीस संजय पाटील, माजी पं.स.सभापती बन्सीलाल पाटील, भाजपा ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस प्रदीप पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, माजी पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार, संजय परदेशी प्राचार्य डॉ.विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र, रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेची वैशिष्ट्ये अशी पाचोरा, भडगाव तालुक्यातील ७० शाळांनी सहभाग नोंदवला. ७८५मुली व १५१० मुलांचा सहभाग होता. क्रीडा स्पर्धेसाठी ५४ पंच होते. सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट देण्यात आले. आर्चरी, तायक्वांदो, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, कुस्ती, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, खो-खो, कबड्डी अशा क्रीडा प्रकारांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.