आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पिलखोड येथे कापूस ठेवलेल्या गाेदामाला आग लागून जवळपास अडीचशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे कळते. आगीचे कारण मात्र समजून आले नाही. मालेगाव तालुक्यातील कळवाडीतील कापूस व्यापारी जगदीश शरद दशपुते यांचे पिलखोड येथे उपखेड फाट्याजवळ गाेदाम आहे. या गाेदामात त्यांनी कापूस साठवून ठेवलेला होता. या गोदामातील कापसाला शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच आसपासच्या ग्रामस्थांनी धाव घेऊन चाळीसगाव अग्निशामक दलाला माहिती दिली.
अग्निशामक दलासह नागरिकांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, उन्हाळा असल्यामुळे आगीने तत्काळ राैद्ररुप धारण केले. दरम्यान, घटनास्थळी मेहुणबारे पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके व पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. या आगीत २५० क्विंटल कापूस जळून जवळपास २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती उपनिरीक्षक चव्हाणके यांनी ‘दिव्य मराठी‘शी बोलताना दिली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर कळवाडी येथील व्यापारी जगदीश दशपुते हे परिसरातून कापूस खरेदी करून या गोदामात ठेवत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.