आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेंदुर्णी येथे साेमवारी 278 वा रथोत्सव; कडोजी महाराज संस्थान तसेच प्रशासनाकडून तयारीला वेग

शेंदुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशातील प्रतिपंढरपूर नगरी असलेल्या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रथोत्सव ७ नोव्हेंबरला साजरा होणार आहे. यंदाचे रथाेत्सवाचे २७८वे वर्ष असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्री त्रिविक्रम मंदिराच्या समोरील हनुमान मंदिरात संत कडोजी महाराज संस्थानचे गादी वारस शांताराम महाराज भगत यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर राेजी संध्याकाळी ४ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. ४ नोव्हेंबर राेजी सकाळी भक्त पुंडलिकांचीही मिरवणूक, श्री त्रिविक्रम मंदिरात डबी बसवली जाईल.

त्यानंतर दुपारी दिंडी सोहळा, सायंकाळी संत कडोजी महाराज यांच्या समाधीच्या जवळ शांताराम महाराज भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण तर रात्री नगर प्रदक्षिणा हाेईल. ५ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहानिमित्त भागवत महाराज शिरसोलीकर यांचे रात्री कीर्तन होईल. रात्री १२ वाजता तुळशी विवाह होईल. ६ नोव्हेंबरला दुपारी दिंडी सोहळा व रात्री पालखी सोहळा होईल. ७ नोव्हेंबर रोजी रथोत्सव, पालखी सोहळा साजरा हाेणार आहे.. ८ नोव्हेंबर राेजी दुपारी दिंडी सोहळा तर रात्री संत कडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरी कीर्तन होईल.

यात्रेनिमित्त नगरपंचायत व भाविक सज्ज
९ नोव्हेंबर राेजी सायंकाळी त्रिविक्रम मंदिरात दहि-काला होईल. तर १२ नोव्हेंबरला रात्री शहरातून सवाद्य भक्त पुंडलिकांची मिरवणुक व संत कडोजी महाराज विठ्ठल रुक्मिणी रथोत्सवाची गांधी चौकातील रथाच्या घरात सांगता होईल. रथोत्सवानिमित्त सोन नदी काठावर यात्रा भरते. यंदा नगरपंचायतीने यासाठी माेठ्या सोयी सुविधा केलेल्या आहेत. रथोत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, असे संत कडोजी महाराज संस्थानचे ८वे गादी वारस शांताराम महाराज भगत व ग्रामस्थांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...