आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:एरंडोल येथील 30 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस मिळाली मंजुरी

एरंडोलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एरंडोल शहरासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली. नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहरासह सर्व नवीन वसाहतीत स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार चिमणराव पाटील यांनी भेट घेवून शहरातील पाण्याच्या समस्येबाबत माहिती देऊन नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचे आवाहन केले होते. यामुळे एरंडाेल व पाराेळा शहरातील पाण्याची समस्या सुटणार असून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यामुळे नागरिकांमध्ये विशेषत: नवीन वसाहतींमधील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यामुळे माेठा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

चार नवीन जलकुंभ : नवाळे
शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेत चार जलकुंभ आणि ८० किलोमीटर पाइपलाइन असल्याची माहिती पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली. या योजनेतील नवीन जलशुद्धीकरण केंद्र दररोज ३ दशलक्ष क्युबिक लिटर शुद्ध पाणीपुरवठा करेल. यासाठी २६५ किलो वॅटचे सोलर सिस्टिम बसवले जाणार आहे. तर पालिका हद्दीतील वस्तीत नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे, असे ते म्हणाले.

पाराेळ्यातील ५४ काेटींची पाणीपुरवठा याेजना मंजुर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एरंडाेल पालिकेच्या २९ कोटी ७९ लाख खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली आहे. तर पारोळा शहरासाठी ही सुमारे ५३ कोटी ७० लाख खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...