आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणाम:चाळीसगावात घरांच्या खरेदीत 30 टक्के घट

चाळीसगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर आता सर्वच क्षेत्रात व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे तयार घरे, फ्लॅट आणि प्लॉटच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्येही गती येईल अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोनाच्या काळात मिळाली मुद्रांक शुल्कावरील सुट बंद झाली आहे. तसेच गृह कर्जावर केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातही अडचणी येत आहेत. त्यामुळे तयार घरे व प्लॉट खरेदीच्या व्यवहारांमध्ये वर्षभरात २५ ते ३० टक्के घट झाल्याची माहिती, बांधकाम व्यवसायिक व वास्तुविशारदांनी दिली.

महागाईमुळे तयार घरे, सदनिका आणि प्लॉट खरेदी गोर-गरीबांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. बांधकाम साहित्य, मजुरी, प्रती चौरस बांधकाम दरात झालेली वाढ, या कारणांमुळे रिअल इस्टेटचे व्यवहार मंदावले आहेत. दिवाळीच्या काळातही ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना काळात मुद्रांक शुल्कात सूट मिळाली होती. मात्र, ही सुट सध्या बंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...