आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामान्य कुटुंबात जन्मलेल्या शुभम गोवर्धन शिरोळे या तरुणाने तिशीमध्येच बॉलिवूडमध्ये स्थान मिळवत गगनझेप घेतली. वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यास संगीताची गोडी निर्माण झाली. तो घरातच तबला, बासुरी, हार्मोनियम, पेटी सारखे वाद्य लीलया वाजवू लागला. मात्र वडिलांचा कल हा त्याने इंजिनिअर व्हावे असाच होता. दरम्यान त्याने डिप्लोमा केला.
त्याने आणखी पुढे शिकावे अशी वडिलांची इच्छा असताना मात्र त्याने संगीतात करियर करणार आहे असे स्पष्ट केले. या जिद्दीपुढे आई-वडिलांनी समझोता केला. या दरम्यान त्याने एरंडोल येथील वसंतराव ठाकूर यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर त्याने थेट मुंबई गाठले. अंधेरी येथे साउंड इंजचा कोर्स केला. अनेक स्टुडिओत बॅकस्टेज म्हणून काम केले गोरेगाव येथे टचवूड नावाचा स्वतःचा स्टुडिओ टाकला. लहान-मोठ्या जाहिरातींसाठी गायक व संगीतकार म्हणून संधी मिळाली असता त्याचे सोने केले.
यशासाठी गवसली आवड, जिद्द व परिश्रमाची त्रिसूत्री
आवड, जिद्द व परिश्रमामुळे आज शुभम जाम ८ या प्रसिद्ध कंपनीत म्युझिक डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. सुप्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती, सोनी म्युझिकसोबत काम करत आहे. विशेष म्हणजे मागील २-३ वर्षात त्याने अनेक जाहिरातही केल्या असून त्यात गायक व संगीत दिले आहे. तसेच पंजाबी चित्रपट भांगडा पाले या चित्रपटास आपले संगीत दिले असून ते हिट देखील झाले. ४ जून रोजी त्याचा ‘राह दिखा दे’ हा अल्बम यु ट्यूब वर रिलीज झाला आहे. शुभम हा एन ई एस हायस्कूलचे निवृत्त शिक्षक जी. डी. शिरोळे यांचा सुपुत्र आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.