आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाचा ऱ्हास:जामनेर-पळासखेडा तीन किमी रस्ता रुंदीकरणासाठी 312 वृक्षांची कत्तल

जामनेर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • तोडलेल्या झाडांच्या बदल्यात पावसाळ्यात करणार वृक्षारोपण

येथील जामनेर-पळासखेडा या तीन किमी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तब्बल ३१२ दीर्घायुषी वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्यात कडूनिंब, चिंच, बाभूळ अशा झाडांचा समावेश आहे. तोडलेल्या वृक्षांच्या मोबदल्यात नव्याने वृक्षलागवड करणे बंधनकारक असले, तरी वृक्षलागवड होत नसल्याने किंवा वृक्षलागवडीचा केवळ देखावा केला जात असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

जामनेर-पळासखेडा या तीन किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम भुसावळ येथील ठेकेदाराने १७ कोटी रूपयांत घेतले आहे. रुंदीकरणाच्या कामापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवून दिलेल्या अंतरात ३१२ दीर्घायुषी वृक्ष येत असल्याने त्यांची तोड करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने संबंधित वृक्षांची तोड करण्यासाठी वनविभागाकडून मुल्यांकन करून घेत रितसर परवानगी घेतली आहे. पावसाळ्यात लावणार झाडे

विकास हवा पण झाडेही लावा
विकास कामांना आमचा कोणताही विरोध नाही. विकास व्हायलाच हवा, मात्र तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात नव्याने झाडे लावणे बंधनकारक आहे. सध्या तसे होताना दिसत नाही. यापूर्वी पाचोरा रोडपासून तर शिवाजीनगरपर्यंत शंभर झाडे तोडली गेली होती. त्याबदल्यात आजपर्यंतही वृक्षलागवड झाली नाही. किंवा झाली असेल तरी ती जगलेली दिसत नाही याची खंत वाटते. कपील शर्मा, वृक्षप्रेमी, जामनेर

ब्रिटिशकालीन झाडांवर चालवली कुऱ्हाड
जामनेर-चिंचखेडा व चिंचखेडा-नेरी असे दोन टप्पे करून १८१८ व १८१९ मध्ये जामनेर नेरी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली होती. त्या वृक्षांच्या संगोपनासाठी मैलकुली नेमल्याचीही नोंद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दप्तरी आहे. इंग्रजांनी अशाप्रकारे नियोजन करून केलेल्या शंभर वर्षांच्या वृक्षांची तोड होत असल्याने वृक्षप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.

एका वृक्षाच्या बदल्यात पाच झाडे लावण्याचे नियोजन निविदेतच केले आहे. मात्र या रस्त्याच्या कडेला जागा नसल्याने वृक्षलागवड करता येणार नाही. त्यासाठी कुठेतरी खुल्या भुखंडावर किंवा सर्व्हीस रोडलगत वृक्षलागवड करावी लागणार आहे. त्याबाबतचे नियोजन लवकरच करून पावसाळ्यात वृक्षलागवड करण्यात येईल. आर.डी.पाटील, उपअभियंता, सा.बां.उपविभाग, जामनेर

बातम्या आणखी आहेत...