आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची प्रतीक्षा:गिरणा धरणात 36 तर मन्याडमध्ये 9 टक्के साठा ; जूनचे दोन आठवडे उलटूनही पावसाची प्रतीक्षा

चाळीसगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्याचे दोन आठवडे उलटले, तरी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गिरणा धरणात ३५ टक्के, तर मन्याड धरणात केवळ नऊ टक्के साठा उरला आहे. तालुक्यात गेल्या तीन- चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होते. काही ठिकाणी हलका पाऊस होत असल्याने तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले डॉहेत. तर तालुक्यातील १४ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले असून गिरणा धरणात ३६ तर मन्याड धरणातही केवळ ९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ३ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उकाडा वाढला. त्यामुळे चाळीसगावकर पुरते बेजार झाले. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते घेवून ठेवली डॉहेत. डॉता पेरणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत नजरा आभाळाकडे लागल्या डॉहेत.

पाऊस लांबल्यास आणखी काही गावांमध्ये टंचाई गत वर्षी तालुक्यात विक्रमी पाऊस होवूनही यंदा १४ प्रकल्पांनी तळ गाठला. देवळी-भोरस, खडकीसीम, वलठाण, कुंझर, वाघला १, वाघला २, कृष्णापुरी, पिंप्री-उंबरहोळ, पिंपरखेड, बोरखेडा, पथराड, ब्राह्मणशेवगे, हातगाव, राजदेहरे या लघु प्रकल्पांमध्ये सध्या शून्य टक्के पाणी साठा आहे. तर तालुक्यासह जिल्ह्यास वरदान ठरलेल्या गिरणा धरणात ३६ टक्के व मन्याड धरणात केवळ ९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उन्हाच्या तडाख्याने जलसाठ्यात घट झाली. ३ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू डॉहे.

बातम्या आणखी आहेत...