आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूखंड डेव्हलप:पाचोऱ्यातील सूतगिरणीसाठी 40 कोटी मंजूर

पाचोरा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात मंजूर झालेल्या तालुक्यातील सूतगिरणीसाठी पहिला ४० कोटींचा हप्ता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे. लवकरच तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी २० एकर जागा घेऊन सुत-गिरणीचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी शेतकरी सभासदांची अडीच कोटी रुपये वर्गणी जमा झाली आहे. भडगाव तालुक्यासाठी स्वतंत्र सूतगिरणी उभारण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याने प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.

चिंतामणी कॉलनीतील सिंहगड या निवासस्थानी साेमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार किशाेर पाटील यांनी ही माहिती दिली. या वेळी गणेश पाटील, संजय गोहिल, भडगाव येथील संजय पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, प्रवीण ब्रह्मणे, चंद्रकांत धनवडे उपस्थित होते. आमदार किशोर पाटील म्हणाले की, पाचोरा शहरात जवळपास १३० खुले भूखंड आहेत. त्यापैकी सुमारे २० कोटी सुरुवातीस व त्यानंतर दहा कोटी मंजूर करून त्याची निविदा काढलेली आहे.

राज्यातील पाचोरा पालिका एकमेव अशी आहे की ज्या पालिकेत संपूर्ण भूखंडांचा विकास करून तेथे संरक्षक भिंत, व पेव्हर ब्लॉक बसवून वृद्धांसाठी मॉर्निंग वॉक टॅक, बसण्यासाठी आसने, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था केली आहे. तर ठिकठिकाणी आसन व्यवस्था व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची योजना हाती घेतली आहे. यासाठी ५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय भाजीपाला मार्केट जवळील जुन्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा राहिलेला भाग डेव्हलप केला जाईल. त्यात नवकार प्लाझा जवळ ३० टक्के जागा शिल्लक असून तेथे ५.५० कोटीचे व्यापारी भवन व त्याला लागूनच पत्रकार भवन बांधण्याची योजना आहे. भडगाव तालुक्यातील २५/१५ योजनेसाठी ५.५० कोटी व भडगाव शहरातील ७० खुले भूखंड डेव्हलप केले आहे, असे ही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...