आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबाव:चाळीसगाव एसटी बस आगारात 40 कर्मचारी रुजू; मात्र 200 अद्यापही आंदोलनावर ठाम

चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेती काम करू मात्र आंदोलन ऐतिहासिक करू : कर्मचाऱ्यांची भूमिका

सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास पगार एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. १० तारखेच्या आत जर पगार झाला नाही तर त्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, अन्यथा कडक भूमिका घेण्यात येईल, या उपमुख्यमंत्र्यांच्या अल्टिमेटमनंतर ४० कर्मचाऱ्यांनी एसटीचे स्टिअरिंग हाती घेतले. २२ मार्चपूर्वी ११५ कर्मचारी कामावर उपस्थित होते. त्यानंतर पवारांच्या अल्टिमेटमनंतर १० असे एकूण १५१ कर्मचारी हजर झाल्याने. ४० बसेस रस्त्यांवर धावत आहेत.

‘तारीख पे तारीख’मुळे आंदोलक खचले
गत १५५ दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पूर्णविराम देणारा निकाल न्यायालय देईल, अशी अपेक्षा आंदोलकांना होती. मात्र, न्यायालयाकडून ‘तारीख पे तारीख’ मिळाली. शिवाय विशेष समितीकडून अहवाल मागवला आहे. सलग ५ महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचारी हिताचा तोडगा निघावा अन‌् पुन्हा सेवा सुरळीत व्हावी, अशी अपेक्षा आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. तसेझाल्यास १ एप्रिलपासून लालपरीची सेवा सुरळीत होईल.

विद्यार्थ्यांचे नुकसान...
महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गावर स्वतंत्र बसेस पाठवल्या जातात. विशेष म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी मानव विकास मिशनच्या बसेसची संख्याही ५०च्या घरात आहे. या माध्यमातून सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना घरापासून शाळा सुरक्षितपणे गाठण्याला हातभार लागतो. सध्या शाळाही नियमित सुरू आहेत. मात्र, परंतु, बंदचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...