आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:चाळीसगाव लोकन्यायालयात 415 प्रलंबित प्रकरणे निकाली

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाणी व फौजदारी न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगावच्या आदेशानुसार, तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि वकील संघातर्फे, राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. त्यात एकूण ४१५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच १ कोटी ९८ लाख १२ हजार ७८५ रूपयांची वसुली करण्यात आली.

राष्ट्रीय लोकन्यायालयात अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, व. स्तर चाळीसगांव एन. के. वाळके, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग- चाळीसगाव एस.डी. यादव, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश, क. स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगाव एस.आर.शिंदे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगाव ए. एच. शेख, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. भागवत पाटील, उपाध्यक्ष अॅड. संदीप सोनार, सचिव अॅड. माधुरी एडके, सहसचिव अॅड. मयुर कुमावत, खजिनदार अॅड. वर्षा देवरे, तसेच पॅनल मेंबर्स अॅड. नीलेश निकम, अॅड. राहुल जाधव, अॅड. कविता जाधव, अॅड. संतोष पाटील, तसेच अॅड. डी.एस.निकम, अॅड. एन.एम.लोडाया, अॅड. ए.बी.मोरे, अॅड. उदय खैरनार, अॅड. साईनाथ महाजन यांनी सहकार्य केले. तसेच न्यायालयीन कर्मचारी सहा. अधीक्षक सी. के. बोरसे व व. लिपिक एस. आर. पवार, डी.के. पवार, योगेश चौधरी, डी. टी. कुऱ्हाडे, किशोर पाटील यांनी कामकाज पूर्ण केले.

४१५ प्रकरणे निकाली : राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखलपूर्व ४,७८५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३१६ इतके प्रकरणे निकाली काढली. ६९ लाख ८० हजार ४४ रूपयांची वसुली झाली. तसेच ळीसगांव न्यायालयातील एकूण दाखल असलेली दिवाणी व फौजदारी ११३२ प्रकरणांपैकी ९९ प्रकरणे निकाली काढून, १ कोटी २८ लाख वसूल झाले.

बातम्या आणखी आहेत...