आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी महामंडळ:42 एसटी कर्मचारी कामावर‎ हजर; 228 अद्याप संपावर‎

चाळीसगाव‎6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी‎ १० मार्चपर्यंत रुजू व्हावे,‎ त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली‎ जाईल, असे आवाहन राज्याचे‎ परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले‎ होते. मात्र या आवाहनाला येथील‎ आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी फारसा‎ प्रतिसाद दिला नाही. चाळीसगाव‎ आगारात परिवहन राज्यमंत्र्यांनी ४‎ मार्च ते १० मार्च या कालावधीत‎ केलेल्या आवाहनानुसार फक्त ४२‎ कर्मचारी कामावर हजर झाले. त्यात‎ चालक २०, वाहक ६ चालक कमी‎ वाहक १, व यांत्रिक विभागातील १६‎ असे एकूण ४२ कर्मचारी हजर‎ झाले.

मात्र अद्याप २२८ कर्मचारी‎ संपावर ठाम आहेत.‎ बडतर्फ किंवा निलंबित असल्यास‎ करावा लागेल अर्ज‎ बडतर्फ किंवा निलंबित कर्मचारी‎ हजर नाही ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर‎ बडतर्फ व निलंबनाची कारवाई‎ करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांपैकी‎ एकही कर्मचारी आतापर्यंत रुजू‎ झालेला नाही. ज्या कर्मचाऱ्यांवर‎ बडतर्फ किया निलंबनाची कारवाई‎ झाली आहे त्या कर्मचाऱ्यांना रुजू‎ व्हायचे असेल तर त्यांना विभाग‎ नियंत्रकांकडे अपील करावे लागेल.‎ डीपीओ, यंत्र अभियंता व विभागीय‎ नियंत्रक यांचा समावेश असलेली‎ समिती त्याबाबत निर्णय घेईल.‎

बातम्या आणखी आहेत...