आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल जप्त:तीन वाहनांमधून 45 म्हशींची सुटका, तिघांवर गुन्हा ; मेहुणबारेत कारवाई, 36 लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्दयीपणे तीन आयशरमध्ये म्हशी कोंबून वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मेहूणबारे पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. त्यात ४५ म्हशींची सुटका केली. याप्रकरणी मध्यप्रदेशातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी म्हशींसह ३ आयशर ट्रक असा सुमारे ३५ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिलखोड गावात नागरिकांनी गुरे कोंबलेल्या ट्रक अडवल्या होत्या. त्यामुळे मेहुणबारेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांनी पथक पाठवले. पोलिसांनी आयशर चालकांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवी केली. पोलिसांनी तिन्ही आयशरमधील ४५ म्हशींची सुटका केली तसेच एम.एच. १८ बी.जी.४८००, एम.एच.१८ बी.एच.३८०० व एम.एच.१८ बी.जी.६२४५ या आयशर ट्रक जप्त केल्या. याप्रकरणी मोहसीन खान सिराज खान (वय ३४, रा. बालसमंद, ता.जि. खरगोन), वसीम खान हनीफखान(वय २७, रा. कॉलनी मेजमपूर, वालसमंद, जि. खरगोन) व सद्दामखान रशीदखान (वय ३३) यांना ताब्यात घेतले. म्हशींना मालेगाव येथील शासकीय गोशाळेत पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...