आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ.चारुदत्त साने यांच्या स्मृती दिनानिमित्त रविवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील नामवंत डॉक्टरांनी शिबिरात आपली सेवा दिली. शिबिरात तब्बल ४५० रुग्णांनी लाभ घेतला.
पाचोरा रोडवरील सरस्वती विद्या मंदिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन हेगडेवार शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कौमुदी साने यांनी केले. या वेळी संचालक डॉ.कल्पक साने यांनी शिबिराचा उद्देश सांगितला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल म्हणाले की “डॉ चारुदत्त साने यांनी तीस वर्षापूर्वी शेंदुर्णी सारख्या छोट्याशा गावात हृदयरोग तज्ञ म्हणून सेवा दिली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून डॉ.कल्पक साने येथे सेवा देत आहेत.आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मोफत आरोग्य शिबिरात मोफत औषधे, तपासणी ,रक्त तपासणी हे सर्व सामाजिक बांधिलकीचे संस्कार आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी कौमुदी साने, कल्पक साने, ऋचा साने, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, उत्तमराव थोरात, राजेंद्र भारुडे, मुख्याध्यापक राजेंद्र गुजर, कडुबा सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ.सुनील बोरसे, नजीर पठाण, सौरभ जोगी, दीपाली चौधरी, संतोष गोंधळी, अमेय पाटसकर, सुनील ब्राह्मणे यांनी सहकार्य केले. शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.