आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणादेवी जंगलातील चंदनाच्या वृक्षांवर तस्करांचा डोळा आहे. १५०० हेक्टर जंगलाच्या सुरक्षेसाठी फक्त एकच वन कर्मचारी असून आधुनिक शस्रांचा अभाव असल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षात तस्करीसाठी पाटणादेवीच्या जंगलात ४७९ चंदनाच्या झाडांची कटाई झाली, तर ५९३ चंदनाच्या झाडांना इजा पोहोचवण्यात आली आहे. हा प्रकार जून २०२१ मध्ये समोर आला आहे. चंदन चोरीच्या घडलेल्या घटना अशा १९ िडसेंबर २०२१ राेजी चंदनाचे वृक्ष तोडताना तरुणाला पकडलेे. तर ३ ते ४ तस्कर दगडफेक करत पसार झाले हाेते. आरोपींकडून चंदनाचा अडीच किलो गाभा व वृक्षतोडीची अवजारे जप्त केली होती.
कन्नड घाट, िपतळखाेरा भागातून तस्करांचा शिरकाव पाटणादेवी अभय अरण्याचा विस्तार ६ हजार ३५५ हेक्टरवर आहे. त्यामुळे या अभयारण्याकडे तस्कर व चाेरट्यांची नेहमीच वाकडी नजर असते. कन्नड घाट, िपतळखाेरा या वरच्या भागातून चंदन चाेर जंगलात शिरतात. अभयारण्याचा संपूर्ण परिसर हा चढ-उताराचा, दाट जंगल व डाेंगरांचा आहे. त्यात दर्शनासाठी माेठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे चंदन चाेर काेण हे समजणे कठीण हाेते. गेल्या आठवड्यात १६ रोजी जंगलात चंदन तस्करी रोखणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर, तस्करांनी गोळीबार करून पळ काढला होता.
२६ सप्टेंबर रोजी पुन्हा बोढरे शिवारात चंदन तस्करीसाठी घुसलेल्या दोघा तस्करांना, वन कर्मचाऱ्यांचा सुगावा लागताच त्यांनी पळ काढला. वन कर्मचाऱ्यांनी तेथून ७ किलो चंदन व दुचाकी असा ५६ हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला. यावेळी वन विभागाच्या पथकावर तस्करांनी गोळीबार करत पळ काढला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.