आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावातावरणात गेल्या १५ दिवसात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला व ताप दिसून येत असल्याने बाल रुग्णांमध्ये ४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाल रुग्णांना विषाणू-जन्य आजाराची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गेल्या काहि दिवसापासून वातावरणात माेठा बदल झाला असून रात्री गारवा तर दुपारी अद्यापही उन्हाच्या झळा जाणवत आहेत. या वातावरणातील बदल व गोवरचा धसका पालकांनी घेतला आहे.
वातावरणातील बदलामुळे जवळपास ४ ते ७ वर्ष वयोगटातील बाल रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात एका दिवसाला सरासरी १५ ते २० लहान बालके विषाणू-जन्य आजाराची दाखल हाेत आहेत. तर खासगी रुग्णालयात ही विषाणू-जन्य आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. यात सर्दी, खाेकला, ताप आदी विषाणू-जन्य आजारांचा समावेश असून पालक बालकांना सोबत घेऊन तपासणी करण्यासाठी रुग्णालयात येत आहेत.
मोठ्या रुग्णांमध्ये ही वाढ गेल्या काही दिवसांपासून बाल रुग्णांप्रमाणे मोठ्या रुग्णांमध्ये देखील व्हायरल फ्लूच्या रुग्णांची वाढ झाली आहे. मोठ्या रुग्णांमध्ये देखील सर्दी, खोकला, घसा खवखवणे, अंग दुखी व तापाची लक्षणे दिसून येत आहेत.
वाढत्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. शहरात गोवरचा एकही रुग्ण आढळू नये म्हणून पालिका रुग्णालयामार्फत शहरात असणाऱ्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना निझर व व्हिटॅमिन ‘अ’चे घरोघरी जाऊन डोस दिला जात आहे. आशा व आरोग्य सेविकांमार्फत हा डाेस दिला जात आहे. त्यात शहरातील ८० टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण केले असून लक्षणे आढळल्यास न.पा. दवाखान्यात संपर्क साधावा.
अशी घ्यावी काळजी
सर्दी, पडसे, खोकला हा इतरांपासून पसरणारा आजार असल्याने अशा वेळी रुग्णाची विशेष काळजी घ्यावी. त्याच्याशी संपर्क टाळावा, दूषित पदार्थ खाण्याचे टाळावे, अति थंड पदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून गार करून प्यावे, स्वच्छता राखावी, आहारात अधिकाधिक फळांचा वापर करावा, घरच्या घरी औषधोपचार टाळावा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, लहान बालकांना आजारी असताना शाळेत पाठवू नये.-डॉ. जि. एम. पाटील, बालरोगतज्ज्ञ, ग्रामीण रुग्णालय, अमळनेर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.