आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेहविक्री व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने लावलेले गांधलीपुरा भागातील ७५ हजार रुपये किमतीचे ५ सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेल्याची घटना ८ राेजी रात्री घडली. अमळनेर नगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाने गांधलीपुरा भागात देहविक्री व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व फायबर ऑप्टिक केबल बसवली आहे.
या परिसरात एकुण २४ कॅमेरे लावण्यात आले असून त्याचे नियंत्रण गांधलीपुरा चौकीत आहे. डिव्हीआर देखील गांधलीपुरा चौकीत ठेवण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी ८ रोजी रात्री हे ५ सीसीटीव्ही कॅमेरे व ऑप्टिकल फायबर केबल असा ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी विद्युत विभागाचे आबीद शेख मोहम्मद शफी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.