आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:गांधलीत वर्गणीतून लावले 5 सीसीटीव्ही

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गांधली येथे मंगळवारी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण झाले. अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथमच गांधली गावाने लोकसहभागातून हा उपक्रम राबवला. त्यासाठी ग्रामपंचायत व पीक संरक्षण संस्थेने ५० हजार, तर ग्रामस्थांनी १० हजार रुपयांची लोकवर्गणी जमवली होती. अशाप्रकारे ६० हजार रुपयांमधून गावात पाच ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गावात दहा महिन्यांपुर्वी एकाचवेळी दहा ठिकाणी घरफोड्या झाल्याने, ग्रामस्थांनी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला.

या यंत्रणेचे लोकार्पण गांधली येथे ग्रामदैवत काकासट महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने, डीवायएसपी राकेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पिक संरक्षण संस्थेचे चेअरमन धनंजय कुलकर्णी यांनी लोकार्पण केले. याप्रसंगी व्हा.चेअरमन दीपक पाटील यांच्यासह सर्व संचालक, प्रवीण पाटील, अनिल पाटील, रामकृष्ण महाजन, सुधाकर साळुंखे, सुधाकर देशमुख, दिनेश पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...