आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवीगाळ:पोलिसाची कॉलर पकडणाऱ्यास‎ 5 वर्षांची शिक्षा; हातेडची घटना‎

अमळनेर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदान केंद्रावर मद्याच्या नशेत हुज्जत‎ घालणाऱ्याला मज्जाव करण्यास गेलेल्या‎ पोलिसांची कॉलर पकडून शिवीगाळ‎ करणाऱ्या आरोपीस अमळनेर जिल्हा‎ न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.‎ चाेपडा तालुक्यातील हातेड बुद्रुक येथील‎ जिल्हा परिषदेच्या शाळेत २१ ऑक्टोबर‎ २०१९ रोजी मतदान सुरू होते. तेथे शरद खंडू‎ रोकडे हा मद्याच्या नशेत मतदान‎ करण्यासाठी आला.

परंतु, त्याच्याकडे‎ मतदान कार्ड नसल्याने त्यास मतदान‎ अधिकाऱ्यांनी मतदान कार्ड घेऊन मतदान‎ करा, असे सांगितले. मात्र, तो‎ अधिकाऱ्यांशी हुज्जत घालू लागला. तसेच‎ त्याने फोन लावून पत्नी व इतरांना बोलावून‎ घेतल्याने वाद वाढले होते. मतदान‎ केंद्राध्यक्षांनी तेथील पोलिस कॉन्स्टेबल‎ रमेश शिवाजी खोपडे यांना वाद मिटवण्यास‎ सांगितले. त्या वेळी शरद राेकडे याने‎ पोलिस कॉन्स्टेबल रमेश खोपडे यांच्याशी‎ हुज्जत घालून शिवीगाळ केली. तसेच‎ त्यांच्या गणवेशाची ओढाताण करून कॉलर‎ पकडली. या बाबत चोपडा ग्रामीण पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या खटल्यात‎ एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात‎ फिर्यादी रमेश खोपडे व महिला पोलिस‎ कॉन्स्टेबल शीतल लोणे यांची साक्ष‎ महत्वाची ठरली. या खटल्याचा तपास‎ पोलिस निरीक्षक संदीप अराक व तत्कालीन‎ उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल‎ यांनी केला. जिल्हा न्यायाधीश पी. आर.‎ चौधरी यांनी आरोपीस पाच वर्षांची शिक्षा व‎ ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष साध्या‎ कारावासाची शिक्षा सुनावली.‎

बातम्या आणखी आहेत...