आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:चाळीसगाव येथील स्वाक्षरी मोहिमेत वेगवेगळ्या क्षेत्रातील 5 हजार नागरिकांनी नोंदवला सहभाग, शहर पोलिस ठाण्याचा उपक्रम; विविध संघटनाचे मिळाले सहकार्य

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जातीय सलोखा राखण्यासाठी चाळीसगाव पोलिस ठाण्यातर्फे आयोजित स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद लाभला. या मोहिमेत मान्यवरांसह तब्बल पाच हजार नागरिकांनी सहभाग नोंदवत स्वाक्षरी केली.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात ७ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे उद‌्घाटन अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या हस्ते व प्रातांधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे, तहसीलदार अमोल मोरे, पालिकेचे मुख्याधिकारी ठोंबरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आदींच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

या मोहिमेत शहरातील व तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटना, धार्मिक संस्थेचे पुजारी, ट्रस्टी, मौलाना, रोटरी क्लब, जॉगिंग ग्रुप, सायकलिंग ग्रुप, शैक्षणिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी, धार्मिक संघटना, शांतता समिती सदस्य, पोलिस पाटील, वैद्यकीय संघटना, मेडिकल असोसिएशन, शासकीय कार्यालय, पोलिस मित्र, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, महिला संघटना व सर्व जाती, धर्माचे नागरिक तसेच सर्व सामाजिक, सांस्कृतिक त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील लोकांनी सहभाग नोंदवला होता.

बातम्या आणखी आहेत...