आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:भडगावला 51 दात्यांनी केले रक्तदान ; वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केले शिबिर

भडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस ठाण्याच्या आवारात प्रथमच भव्य रक्तदान शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले हाेते. या शिबिरात शहर परिसरातील ५१ दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. येथील पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस हवालदार विलास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबिर घेण्यात आले. त्यांचा ५१ वा वाढदिवस असल्याने तेवढ्या दात्यांनी रक्तदान करावे, असे उद्दिष्ट पाेलिस ठाण्यातर्फे निश्चित करण्यात आले हाेते. नियोजित वेळेत ५१ दात्यांनी रक्तदान केले. जळगावच्या रेड प्लस ब्लड सेंटरच्या नियोजनात हे रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरात तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलिस निरीक्षक अशोक ऊतेकर, वैद्यकीय अधिकारी साहेबराव अहिरे, शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक, पोलिस मित्र, उपस्थित होते. भडगाव पोलिस ठाण्यामार्फत प्रथमच असे रक्तदान शिबिर आयोजित केलेे. नियोजन पोलिस अंमलदार स्वप्नील चव्हाण यांनी पोलिस मित्रांमार्फत केले होते.

बातम्या आणखी आहेत...