आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पाडळसरे धरणाचे काम वेगाने व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाडळसे धरणाचा समावेश करावा, या मागणीसाठी अमळनेरातील विद्यार्थी व नागरिकांनी लिहिलेले ५१ हजार पोस्टकार्ड, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ९ रोजी पाठवले जाणार आहेत. प्रारंभी मिरवणूक काढून नंतर पोस्टकार्ड पत्रपेटीत टाकून रवाना केले जातील, अशी माहिती पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. सार्वजनिक हिताच्या प्रश्नासाठी मोठ्या संख्येने पोस्टकार्ड पाठवण्याचा विक्रम अमळनेरात नोंदवला जाईल. धरणाचे काम २३ वर्षांपासून रखडल्याने पाडळसे धरण जनआंदोलन समिती वेळोवेळी आंदोलने करत आहे. या प्रकल्पाला आता केवळ केंद्र सरकारच्या योजनेतूनच अपेक्षित निधी मिळू शकतो.
म्हणून महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असूनही उपयोग होत नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाभक्षेत्रातील जनतेकडून पोस्टकार्ड लिहून घेण्याचे आंदोलन मागील चार महिन्यांपासून सुरू होते, अशी माहिती पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे यांनी दिली. यावेळी जनआंदोलन समितीचे हेमंत भांडारकर, रामराव पवार, महेश पाटील, हिरामण कंखरे, सुनिल पाटील, राजू देसले, नारायण बडगुजर हजर होते.
...तर मतदानावर बहिष्कार आंदोलनात हजारो विद्यार्थी, नागरिक आणि विविध संघटनांनी सहभाग नोंदवला. पाडळसे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत न झाल्यास, लाभक्षेत्रातील जनता येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशारा पत्राद्वारे दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.