आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर पालिकेची कारवाई‎:53 थकीत करदात्यांची‎ नळ जाेडणी केली खंडित‎

अमळनेर‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर परिषदेच्या वसुली पथकामार्फत‎ घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी असलेल्या‎ नागरिकांचे नळ कनेक्शन बंद करणे व जप्ती‎ कारवाई मोहीम सलगपणे सुरू आहे. आज‎ शहरातील ५३ थकबाकी धारकांची नळ जाेडणी‎ खंडीत करण्यात आली आहे.‎ शहरातील ढेकू रोड भागातील कृषी कॉलनी,‎ धनदाई कॉलेज परिसर, आदित्य संकुल या‎ भागातील सकाळ सत्रात ४० नळ कनेक्शन बंद‎ करण्यात आले असून दुपार सत्रात मुंबई गल्ली,‎ बाहेर पुरा, बाजार पट्टा या भागातील १३ असे एकूण‎ ५३ नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.‎

अमळनेर शहरात सुमारे एक लाखाच्या वर‎ वसुली केलेली आहे. या वसुली मोहिमेत उप‎ मुख्याधिकारी संदीप गायकवाड, कर निरीक्षक‎ जगदीश पदमार, वसुली लिपिक सतीश बडगुजर,‎ भरारी पथकातील सोमचंद संदानशिव, नितीन‎ खैरनार, गणेश शिंगारे, अकिल काजी व जाफर‎ पठाण यांनी सहकार्य केले. सततच्या कारवाईमुळे‎ घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी भरणाऱ्यांची संख्या‎ वाढली आहे. नागरिकांना आपल्यावर अशी वेळ‎ येणार नाही, याची दक्षता घेऊन वेळीच थकीत‎ रक्कम अमळनेर नगर परिषदेत ऑनलाईन किंवा‎ कार्यालयात येऊन रोखीने अथवा धनादेशाद्वारे‎ भरणा करावी, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत‎ सरोदे यांनी केले आहे. दरम्यान, काही‎ दिवसांपासून अमळनेर पालिकेने सुरु केलेल्या‎ धडक कारवाईने थकबाकीदार धास्तावले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...