आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा:मोडी लिपी कार्यशाळेचा 53 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्षातर्फे तीन दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा नुकताच समारोप झाला. कार्यशाळेत ५ प्राध्यापक व ५३ विद्यार्थ्यांचा सहभाग हाेता.समारोप प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रोहन मोरे अध्यक्षस्थानी होते. तर व्यासपीठावर मोडी लिपीचे मार्गदर्शक मनोज चौधरी, प्राचार्य डॉ. डि. आर. पाटील, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. गोकुळ बोरसे, प्रा. जे. बी. पाटील, डॉ. डि. एच. राठोड उपस्थित होते.

प्रशिक्षक मनोज चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नवीन ज्ञान प्राप्त करण्याचे आवाहन करून मोडी लिपीचा नियमित सराव करावा, असे सांगितले. प्राचार्य डि. आर. पाटील व रोहन मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थी ऐश्वर्या पाटील, योगेश पाटील, गायत्री ठाकरे, भाग्यश्री महाले, निकिता पाटील यांनी प्रशिक्षणाचा कसा लाभ झाला ते सांगितले. या कार्यशाळेचे संपूर्ण आयोजन डॉ. गोकुळ बोरसे यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रा. पी. एच. भावसार यांनी तर डॉ. के‌. डी. अहिरराव यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...