आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड कोटींचा अपहार:शौचालय गैरव्यवहारात आणखी ६ जणांना अटक

रावेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समितीच्या माध्यमातुन तालुक्यात राबवलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेत दीड कोटींचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात रविवारी आणखी ६ जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी अटक झालेल्यांची एकूण संख्या आता २४ झाली आहे.

तालुक्यात राबवलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेच्या अनुदान वितरणात दीड कोटींचा अपहार झाला आहे. या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत पंचायत समितीचे लेखाधिकारी लक्ष्मण पाटील, ग्रामविस्तार अधिकारी दीपक सदानशिव, निवृत्त ग्रामविस्तार अधिकारी डी.एच.सोनवणे, गट समन्वयक समाधान निंभोरे यांच्यासह एकुण १८ जणांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. हे सर्व जण सध्या जळगाव जिल्हा कारागृहात आहेत. दरम्यान, पोलिसांनी रविवारी पुन्हा अटक सत्र राबवत कामील जमील खान, फिरोज जमील खान, अरबाज फिरोज खान (तिघे रा.लुमखेडा), आदाम जहाखाँ तडवी (कुसुंबा खुर्द), रमेश सुभान तडवी (कुसुंबा खुर्द) व शेख आरिफ शेख रईस (उदळी) या सहा जणांना अटक केली आहे. हे सर्व लाभार्थी आहेत.

तिघे एकाच कुटुंबातील
या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण २४ आरोपींना अटक झाली. रवीवारी अटक केलेले लुमखेडा येथील संशयित तिघे जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यांच्या नावे एक लाखाच्यावर शौचालय अनुदानाची रक्कम वर्ग झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...