आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाच वर्षांपासून लेखापरीक्षण नसलेल्या जिल्ह्यातील 6300 संस्थांची नाेंदणी रद्द

याेगेश वाणी | जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक कार्यासाठी सुरू केलेल्या मात्र पाच वर्षांपासून नियमित लेखापरीक्षण अहवाल, चेंज रिपोर्टसह नियमित कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या जिल्ह्यातील ६३०० स्वयंसेवी संस्थांची नाेंदणी धर्मादाय उपायुक्तांनी रद्द केली. शासनाच्या वर्षभरापूर्वीच्या परिपत्रकानुसार ही कारवाई झाली.संस्था अस्तित्वात असल्या तरी त्या कुठल्याही प्रकारचे सामाजिक दायित्व निभावण्यात सक्रिय नाहीत. ज्या संस्थांचे पाच वर्षांपर्यंत लेखापरीक्षण झालेले नाही व बदल अर्ज सादर न केलेल्या संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती.

यावर धर्मादाय आयुक्तांनी नियमांना डावलणाऱ्या ट्रस्टचा आढावा घेतला. अशा सर्व संस्थांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. यानंतरही संस्थांकडून समाधानकारक उत्तर आले नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत २५ हजार ५४ सामाजिक, शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा, वाचनालय, बहुउद्देशीय संस्था आहेत; परंतु अनेक संस्था स्थापन झाल्या असल्या तरी त्या दरवर्षी संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल देत नाहीत.

नाेंदणी केलेल्या संस्था
नाेंदणी केलेल्या संस्था हिंदूधर्मीय (१३८१), मुस्लिम (५०६), फारशी (१), ख्रिश्चन (७), ट्रस्ट (१६१७), स्वयंसेवी, सामाजिक बहूउद्देशिय संस्था (२१५४२) आहेत. नाेंदणीसाठी दाखल प्रकरणांची संख्या ७५, वादग्रस्त प्रकरणे ४४९ आहेत. धर्मादाय रुग्णालये आठ.

बातम्या आणखी आहेत...