आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त प्रतिसाद‎:विज्ञान प्रदर्शनात 65 प्रकल्प सादर‎

फैजपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खिरोदा येथील धनाजी नाना व‎ कनिष्ठ महाविद्यालयात शालेय‎ विज्ञान प्रदर्शन नुकतेच भरवले गेले. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाट्न माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम ‎यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले. दीपप्रज्ज्वलन प्रा. सुवर्णा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.‎ विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात‎ उपयोगी ६५ प्रकल्प सादर केले.‎ प्रास्ताविक वृषाली इंदासराव‎ यांनी केल्यावर, मुख्याध्यापिका‎ मनिषा महाजन यांनी अतिथींचे‎ स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी‎ तयार केलेल्या सर्व माॅडेल्सची‎ पाहणी मान्यवरांनी केली. पर्यवेक्षक‎ आर.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या‎ कल्पकतेचे कौतुक केले.

इयत्ता‎ पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी‎ दैनंदिन जीवनात उपयुक्त विज्ञान व‎ तंत्रज्ञानावर आधारीत विद्युत,‎ पर्यावरण, प्रदूषण, पाणी बचत,‎ ऊर्जा संसाधन, शेतीपूरक असे ६५‎ प्रकल्प सादर केले होते.‎ मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी‎ सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन‎ करुन जीवनातील विज्ञान व‎ तंत्रज्ञानाचे महत्त्व सर्वांनी माहित‎ करुन घ्यावे. शालेय विज्ञान प्रदर्शन‎ हा विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने‎ व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा‎ मार्ग आहे. यात सहभाग घ्यावा असे‎ आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...