आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूहल्ला:चाकूहल्ला प्रकरणी 7 दिवसांची कोठडी; अनैतिक संबंधाच्या वादातून यावलमधील घटना

यावल10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनैतिक संबंधातून शुक्रवारी पहाटे तिघांनी शहरातील एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता. या तिघांना फैजपूर शहरातून अटक करण्यात आली. यानंतर त्यांना शनिवारी येथील न्यायालयात हजर केल्यावर १३ मे पर्यंत ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शहरातील पटेल वाडा भागातील जावेद युनूस पटेल (वय २३) या तरुणाचे शहरातील एका भागातील विवाहितेसोबत अनैतिक संबंध होते. या वादातून शुक्रवारी पहाटे जावेद पटेल याच्यावर भुसावळ रस्त्यावरील घोडेपीर बाबा दर्गा जवळ शेख मुजम्मिल उर्फ मुज्जू शेख हकीम (वय २६), हिदायत अली उर्फ राजू शेखावत अली (वय २०) व शेख शोएब शेख इक्बाल खाटीक (वय २९, तिन्ही रा.ताहानगर, फैजपूर) यांनी चाकूने वार केला. या हल्ल्यात जावेद गंभीर जखमी झाला. दरम्यान, चाकू हल्ल्यानंतर तिघांनी तिथून पळ काढला. जावेद पटेल यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या तिघांना शुक्रवारी रात्री यावलचे परिविक्षाधीन पोलिस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांनी अटक केली. तिघांना शनिवारी यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश एन.एस.बनचरे यांच्यासमोर हजर केले. सुनावणीअंती १३ मे पर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक आशित कांबळे, पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर ह्या करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...