आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांमध्ये भीती:बहादरपूर, शिरसोदे येथे एकाच रात्रीत फोडली 7  घरे

पारोळा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बहादरपूर, शिरसोदे येथे शुक्रवारी एकाच रात्रीत बंद असलेल्या सात ठिकाणी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. एकाच रात्री ७ ठिकाणी घरफोड्या होण्याची ही तालुक्यात पहिलीच घटना आहे. दरम्यान, यात एका किराणा दुकानातून चाेरट्यांनी ४० हजार रुपये लांबवले असून ७ पैकी ६ घरांचे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने नेमका किती रुपयांचा एेवज चाेरीला गेला, याची माहिती मिळाली नाही. दरम्यान, दाेन दुचाकींवर सहा चाेरटे सीसीटीव्हीत दिसून आले आहेत.

बहादरपूर येथील ३ तर शिरसोदे येथे ४ बंद घरे चाेरट्यांनी फोडले आहेत. बहादरपूर येथील माजी सरपंच भिकन चौधरी, उपसरपंच राजेंद्र माकडे, डॉ. विशाल बडगुजर यांचे तर शिरसोदा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य जयकुमार पाटील, हरिश्चंद्र मुसळे, भगवान बडगुजर यांच्या बंद घरात घरफाेडी झाली.

बहादरपूर व शिरसोदे येथील चोरीच्या घटनेत एकूण ७ पैकी ६ कुटुंबातील व्यक्ती बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून काय चोरी गेले, याची माहिती सायंकाळी उशिरापर्यंत मिळाली नाही. परंतु, हरिश्चंद्र पुंडलिक मुसळे यांच्या किराणा दुकानातून ४० हजार रुपये रोख चोरी झाल्याची फिर्याद पारोळा पोलिसांत दाखल झाली आहे. तर जयकुमार पाटील हे कुटुंबासोबत पुण्यास गेले असून त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरी झाल्याची गावात चर्चा आहे. ते आल्यावरच चाेरीची माहिती मिळेल. तर राजेंद्र वाणी, सुनील चौधरी, भगवान बडगुजर, सुरेश मालचे हे बाहेरगावी असल्याने त्यांच्याकडील चोरीच्या मुद्देमालाची माहिती मिळाली नाही.

चाेरी करताना बाजूच्या घरांना लावल्या कड्या
एके ठिकाणी सीसीटीव्हीत गुन्हेगार दिसत आहेत. दोन दुचाकींवर सहा चाेरटे असून त्यांच्याजवळ एफझेड व केटीएम गाड्या आहेत. चोरट्यांनी सोबत कटर यंत्रही आणले हाेते. तर चाेरट्यांनी चोरी करण्यापूर्वी बाजुच्या घरांच्या कड्या बाहेरून लावल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. गावात रात्री पेट्रोलिंगसाठी पाेलिस गाडी येते. मात्र, ही गाडी नादुरुस्त असल्याने चाेरट्यांना लाभ झाला. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सकाळी जळगाव येथे संपर्क साधून श्वान व फिंगर प्रिंट्स पथकाला पाचारण केले.

बातम्या आणखी आहेत...