आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा 729 गोण्या रेशनचा तांदूळ पकडला

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा परवाना नसताना, काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करून ठेवलेला, ७२९ गोण्या रेशनचा तांदूळ महसूल व पोलिसांच्या पथकाने उंबरखेड येथे पकडला. तांदूळ साठ्याची किंमत ६ लाख ७० हजार ९५० रूपये आहे.चाळीसगाव विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्यासह महसूल व पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी ट्रकसह एकूण १६ लाख २९ हजार ९० रूपयांचा ऐेवज जप्त केला आहे.

उंबरखेड ते आडगाव रोडलगत नीलेश ऊर्फ पप्पू सुरेश वाणी याच्या मालकीच्या गोदामातून (एमएच.१८ अेसी.१९११) या ट्रकमध्ये रेशनचा तांदूळ नेला जात असल्याची, गुप्त माहिती १५ डिसेंबर रोजी रात्री १०.४५ वाजता सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाली होती.

त्यामुळे देशमुख यांच्यासह तहसीलदार अमोल मोरे, पुरवठा अधिकारी राजेंद्र ढोले, तलाठी दिनेश येडे, रवींद्र ननवरे यांनी दोन पंचांसह गोदामावर पहाटे छापा टाकला. पथकाला पाहून ट्रकचालक वाहन सोडून पसार झाला. तर संशयित नीलेश ऊर्फ पप्पू सुरेश वाणी (रा.उंबरखेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पसार ट्रक चालकाचे नाव रफीक शहा गफुर शहा असे सांगितले. याप्रकरणी दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला.

कारवाईबाबत गुप्तता
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया चालू असल्याने पोलिसांना तात्काळ पुढील कार्यवाही करता आली नाही. पथकाने उंबरखेड येथून मुद्देमाल जप्त करून बुधवारी कारवाईची माहिती उघड केली.

बातम्या आणखी आहेत...