आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागृहकर्ज मंजूर करुन देतो, अशी बतावणी करून कासोदा येथील एकाने पाचोऱ्यातील महिलेची ७६ हजार रुपयांत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पाचोरा शहरातील गिरड रोडवरील भवानी नगर भागातील रहिवासी रेखा संजय पाटील (वय ४२) या महिला किराणा दुकान चालवून आपल्यासह परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात. रेखा पाटील यांनी नवीन घर बांधण्यासाठी गृहकर्ज काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एरंडाेल तालुक्यातील कासाेदा येथील धान्य मार्केट समाेर राहणाऱ्या कुणाल सुनील चौधरी याने रेखा पाटील यांची गृह कर्जाची फाइल मंजुर करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून १८ मे २०२२ ते २५ मे २०२२ या कालावधीत टप्प्या टप्प्याने आॅनलाइनच्या माध्यमातून तसेच ५५ हजार रुपये रोख असे एकूण ७५ हजार ९०० रुपये घेतले आहेत.
त्यानंतर रेखा पाटील यांनी वारंवार कुणाल चौधरी याच्याकडे गृह कर्जाच्या फाइलबद्दल चौकशी केली. परंतु, कर्ज न मिळाल्याने त्यांनी दिलेली रक्कम परत करावी, अशी मागणी केेली. परंतु, कुणाल चौधरी याने पैसे परत न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रेखा पाटील यांनी पाचोरा पोलिस ठाणे गाठून कुणाल चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.