आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:चाळीसगावात 14 ग्रा.पं.साठी 79 टक्के मतदान

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. एकूण ५५ मतदान केंद्रांवर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ७९.०४ टक्के मतदान झाले. १४ गावात सरपंच पदासाठी ४८ तर सदस्य पदासाठी ३११ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान होणाऱ्या गावांमध्ये तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश असल्याने मतदान शांततेत पार पाडण्यासाठी शहर व ग्रामीणचा पोलीस मोठा बंदोबस्त तैनात होता.

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी डामरून व अंधारी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्य. रविवारी सकाळी ६.३० वाजता मतदानाला सुरूवात झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत १८ हजार ४२१ पुरुष व १६ हजार ८१५ महिला अशा एकूण ३५ हजार २३६ मतदारांपैकी ९०५६ पुरुष व ८७५० महिला मतदारांनी हक्क बजावला. दुपारपर्यंत ५०.५३ टक्के मतदान झाले होते. सायकांळी ५.३० पर्यंत २७ हजार ८५० मतदारांनी हक्क बजावला, अशी माहिती तहसीलदार अमाेल माेरे यांनी दिली. मेहुणबारे येथे सायंकाळपर्यंत मतदान सुरू होते. आता तालुक्याचे लक्ष मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

उद्या मतमोजणी, दुपारपर्यंत हाती येणार निकाल
रविवारी सर्वाधिक ९१.०२ टक्के मतदान पिंपळवाड म्हाळसा येथे व सर्वात कमी ७२.२४ टक्के मतदान मेहुणबारे येथे झाले. मंगळवारी तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...