आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाकडून तयारी पूर्ण:पाचोऱ्यातील 80 मंडळे देणार गणरायाला निरोप

पाचोरा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती विसर्जनासाठी पाचोरा पोलिस स्टेशन व पालिकेने जय्यत तयारी केली आहे. बहुतांश गणेशभक्त बहुळा प्रकल्पात विसर्जन करतात. तेथ पालिकेने बहुळा पुलावर व्यवस्था केली आहे.विसर्जनस्थळी पाच पट्टीचे पोहणारे तैनात असतील. सोबतच पोहण्यासाठी दोन ट्युबची व्यवस्था केली आहे. रात्री उशिरापर्यंत विसर्जन चालल्यास प्रकाश व्यवस्था केलेली आहे. पाचोरा तालुक्यात ग्रामीण भागात ४ सार्वजनिक व २४ खासगी, तर शहरी भागात १६ सार्वजनिक व ३६ खासगी गणेश मंडळांनी स्थापना केली आहे.

शहरातील श्री गणेशाच्या विसर्जनासाठी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशनरोड, जामनेर रोड, आठवडे बाजारपेठ पासून कृष्णापरीमार्गे गोराडखेडा, पश्चिम भागातील गणेश भक्तांनी भडगाव रोडकडून जळगाव चौफुलीमार्गे कृष्णापुरी ते गोराडखेडा येथून बहुळा प्रकल्पात विसर्जनासाठी मार्ग ठरवून देण्यात आला आहे. डीवायएसपी भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त असेल. ग्रामीण भागातील श्री गणेशाच्या विसर्जनासाठी गिरणा नदीपात्र, हिवरा, सातगाव डोंगरी, घोडसगाव, वाणेगाव, पिंपळगाव, बांबरुड, लोहारा, कोकडी, कोल्हे प्रकल्प, उतावळी, बहुळा, इंद्रायणी नदीपात्रात व्यवस्था आहे.

बातम्या आणखी आहेत...