आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील विभाजन झालेल्या ६ ग्राम पंचायतींपैकी लोंजे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध ठरल्याने पाच ग्रामपंचायतींसाठी पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया गुरुवारी शांततेत पार पडली. एकुण १५ मतदान केंद्रावर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकुण ८२.१४ टक्के मतदान झाले.
या निवडणुकीत सर्वाधिक मतदान सुंदरनगर येथे ९१.०४ टक्के व सर्वात कमी मतदान आंबेहाेळ येथे ७९.०८ टक्के इतके झाले. दरम्यान, तालुक्यात विभाजीत झालेल्या तळेगाव, कृष्णानगर, लोंजे, आंबेहोळ, सुंदरनगर व चिंचगव्हाण या ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला मतदान घेण्यात आले. सुंदरनगर तांडा ग्रामपंचायतींच्या ५ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात हाेते. चिंचगव्हाण ग्रामपंचायतीत ५ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आंबेहोळ ग्रामपंचायतीत १० जागांसाठी २७ उमेदवार व कृष्णानगर ग्रामपंचायतीत एसटी महिला या जागेवर कुणीच उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ही जागा रिक्त आहे. तर येथील उर्वरित ८ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात हाेते. लोंजे ग्रामपंचायत बिनविरोध ठरली हाेती. एकूण ६ ग्रामपंचायतीतील २० प्रभागात ५४ जागांपैकी २१ जागा बिनविरोध ठरल्या असून ३२ जागांसाठी आता ९५ उमेदवार रिंगणात हाेते. तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या तळेगाव ग्रामपंचायतीत देशमुख यांच्या ग्रामविकास पॅनलच्या ७ जागा बिनविरोध ठरल्या आहेत. तर उर्वरित सर्वसाधारण वर्गाच्या ४ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात हाेते.
आज मतमोजणी; दुपारपर्यंत निकालाची आशा
मतदारांनी उत्साह दाखवल्यानंतर आता निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरूवात होईल. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी माहिती तहसीलदार अमाेल माेरे यांनी दिली.
गावनिहाय झालेले मतदान (कंसात एकूण मतदान)
तळेगाव - ८३.०३ टक्के (१०४२), कृष्णानगर - ८३.६५ टक्के (१००४), आंबेहोळ - ७९.०८ टक्के (२९२५), सुंदरनगर - ९१.०४% (९२५) व चिंचगव्हाण - ८०.११ टक्के (७५३).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.