आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:चोसाकाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल करा

चोपडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस अधिकाऱ्यांकडे विजय पाटलांची मागणी

चोपडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी १७ लाख रुपये घेवून ही रक्कम पूर्णपणे परत केलेली नाही. तर उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील यांनी पाेलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा पाेलिस अधीक्षकांना ही देण्यात आली आहे.

विजय पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, चाेसाकाचे चेअरमन अतुल भीमराव ठाकरे यांच्या सांगण्यावरून मी चोसाकाला चोपडा पीपल्स बँकेत घर गहाण ठेऊन १७ लाखांची आर्थिक मदत केली होती. त्याच वर्षी चोसाकाची साखर विकून मला पैसे परत करण्याची बोली होती. परंतु, अद्याप मला माझी रक्कम परत केली नाही. मी १७ लाख रुपये दिले तेव्हा संचालक प्रवीण गुजराथी, अनिल पाटील, कॅशीयर बागुल उपस्थित होते. माझी रक्कम साखर विकून बँकेत पैसे भरू, असे आश्वासन अतुल ठाकरे यांनी दिले होते. मी मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला पण त्यांनी माझा विश्वासघात केला आहे. १७ लाखांपैकी थाेडे-थाेडे करून मला साडेनऊ लाख दिलेत. परंतु, उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सध्या चोसाका बारामती ऍग्रो कंपनीने चालवायला घेतला आहे. तर आता माझी पूर्ण मानसिक स्थिती खराब झाली असून मला २०२१मध्ये हृदयविकाराचा झटका ही आला आहे. तसेच पीपल्स बँकेचे पैसे भरले नाहीत म्हणून माझ्यावर बँकेने गुन्हा दाखल केला आहे.

माझे कर्ज दिवसेंदिवस वाढत आहे. मी चोसाकात संचालक असून तेथे काय सुरू आहे, हे कोणत्याही संचालकांना अतुल ठाकरे माहिती देत नाहीत. चोसाकाच्या बैठकीत अनेक गोष्टी लपवल्या जातात. या गोष्टी तपासल्या तर मोठा भ्रष्टाचार बाहेर निघेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

पैसे परत मागू नये म्हणून हे षड‌्यंत्र
विजय पाटील यांनी स्वतःच्या नावावर एक रुपया दिला नाही. मी त्यांना एका व्यक्तीकडून खासगीत ७ लाख रुपये दिले आहेत. ते पैसे मी परत मागू नये म्हणून हे षड्यंत्र आहे. त्यांच्या नावाची कुठल्याही प्रकारे चोसाकाकडे ठेव नाही. ठेव असेल तर विजय पाटील यांनी सिद्ध करावे.
अतुल ठाकरे, चेअरमन, चोसाका

बातम्या आणखी आहेत...