आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ९ गावांना गेल्या चार वर्षांपूर्वीच महसूल दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु, चार वर्ष उलटूनही या गावांची आॅनलाइन नाेंदणी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना ताेंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे १ आॅगस्टपासून जाेपर्यंत न्याय मिळत नाही, ताे पर्यंत उपाेषण करण्याचा इशारा या ९ गावातील पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी दिला आहे.
तालुक्यातील चैतन्य तांडा, इच्छापूर क्रमांक १, २, ३ यासह हरिनगर, साईनगर, शामवाडी, तांडा नंबर ३२, सुंदरनगर, दीपनगर व आधीचे गोरखपूर, वाघरी, नाईक नगर अशा एकूण ९ व या पूर्वीचे ३ तांड्यांना गेल्या चार वर्षांपूर्वीच महसूल दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र, चार वर्षे उलटूनही महसूल दर्जा प्राप्त गावांची ऑनलाइन नोंद झालेली नाही. यामुळे सातबारा उतारा, नकाशा व आकार-बंद काढता येत नाही. परिणामी शासकीय लाभांसह इतर लाभांपासून या गावातील नागरिकांना वंचित राहत असल्याचे प्रकार घडत आहेत.
दरम्यान, चैतन्य तांड्याच्या सरपंच अनिता दिनकर राठोड यांनी २० जून रोजी येथील भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षकांकडे पत्रव्यवहार करून १५ दिवसांच्या आत अहवाल कळवावा, अशी विनंती केली होती. मात्र, आजपर्यंत कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे या महसूल प्राप्त गावांना न्याय मिळावा, यासाठी या सर्व ९ गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मिळून १ ऑगस्टपासून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरु ठेवण्यात येईल, असा इशारा विजभाजचे तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.