आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीजचोरी रोखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून महावितरणने शहरात कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमे ३०२ वीजग्राहकांना ९० लाखांचा दंड करण्यात आला आहे.धरणगावचे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त अभियंता प्रशांत ठाकरे यांनी वीजचोरीविरुद्ध मोहीम राबवली. वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहक हिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, मीटरच्या अचूक रीडिंगला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरात राबवलेल्या या मोहीमेत ३०२ जणांनी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याची नोंद ऑनलाइन झाली आहे. यात मीटरमध्ये आधुनिक उपकरणांचा वापर करून छेडछाड केल्याचे समोर आले. त्यामुळे वीजचोरांना ९० लाखांचा दंड करण्यात आला. या मोहीमे महावितरण अभियंत्यांसह ४० कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंडासह अंधारात राहण्याची शिक्षा भोगावी लागू शकते. चोरी केलेल्या विजेपेक्षा पाचपट रकमेचा दंड तसेच शिक्षादेखील होऊ शकते, अशी माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली. आगामी काळातही कारवाई सुरु ठेवली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.